व्यंगोबानाथाची कहाणी
भुलाबाईची कथाच न्यारी. तिची सारीच तर्हा न्यारी. भुलाबाईने काय केलं? दळणाच्या डब्यामागे चार पैसे साठले होते. कनवटीला लावून तिने इस्पितळ गाठलं होतं. बाळाचा एक्स-रे झाला. डॉक्टर म्हणे- सीटीस्कॅन करा. बाळाचा सीटीस्कॅन झाला. डॉक्टर म्हणे- एमआरआय करा. बाळाचा एमआरआय झाला. बाळाचं ऑपरेशन झालं. बाळ बरंच सुधारलं. वर्षाच्या अखेरीस धरून धरून चालू लागलं.......